ठाकरे गटाचे स्टार प्रचारक ठरले

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे स्टार प्रचारक ठरले

मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी ९६ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २४  जणांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. उमेदवार अर्जांची छाननी आज झाल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निडवणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली जात आहे. काँग्रेसने ४० प्रचारकांची यादी जाहीर केली असताना आता उद्धव यांच्या शिवसेनेकडूनही २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत महाविकास आघाडीकडून प्रचारात आघाडी घेतली आहे. 

 

स्टार प्रचारकांची यादी 

1. उद्धव ठाकरे

2. आदित्य ठाकरे

3. संजय राऊत

4. अरविंद सावंत

5. भास्कर जाधव

6. अनिल देसाई

7. विनायक राऊत

8. आदेश बांदेकर

9. अंबादास दानवे

10. नितीन बानुगडे पाटील

11. प्रियांका चतुर्वेदी

12. सचिन अहिर

13. सुषमा अंधारे 

14. संजय (बंडू) जाधव

15. किशोरी पेडणेकर

16. ज्योती ठाकरे

17. संजना घाडी

18. जान्हवी सावंत

19. शरद कोळी

20. ओमराज निंबाळकर

21. आनंद दुबे

22. किरण माने

23. प्रियांका जोशी

24. लक्ष्मण वडले
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number