सांगली, १७ मे २०२३, प्रतिनिधी : सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.
मृतांमध्ये ४ महिला आणि १ लहान मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असून हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वड्डी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचली असता ,विरुद्ध दिशेने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला, भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन ६ जण जागीच ठार झाले आहेत, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.