दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शाळांमधील शिक्षक आक्रमक झाले होते. जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर दहावी-बारावीचे पेपर तपासणार नसल्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला होता. त्यामुळे, दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशीरा लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. विना अनुदानित शिक्षक संघटनेने प्रलंबित […]

दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शाळांमधील शिक्षक आक्रमक झाले होते. जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर दहावी-बारावीचे पेपर तपासणार नसल्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला होता. त्यामुळे, दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशीरा लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

विना अनुदानित शिक्षक संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासण्यासाठी नकार दिला होता. यावर शिक्षकांच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य होतील मात्र, विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरू नये, असे आवाहन अध्यक्ष गोसावी यांनी केले आहे. तसेच शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू मात्र, दहावी-बारावीचे निकाल वेळेतच लागणार असल्याचे महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number