मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झाली आहे. नाशिककरांना गार वाऱ्यानंतर आता उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नाशिकमध्ये मागील चोवीस तासात ३४.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिकमध्ये मागील चोवीस तासात ३४.८ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद करण्यात आली आहे. हळूहळू कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून, येत्या काही दिवसांत तापमान चाळिशी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील काही दिवस तापमानाचा हा वाढता पारा कायम राहणार असून गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढत जाणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली असून नाशिकमध्ये उन्हाच्या झळा बसत आहे. त्यामुळे नाशिककर बाहेर पडतांना चष्मा, टोपी, स्कार्फचा वापर करत आहेत. तर गर्मीपासून बचावासाठी थंड पेय पिऊन नाशिककर उन्हापासून संरक्षण करत आहे.