तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जूनने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्याने स्वतः आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवर आपण विलगीकरणात असल्याची माहिती दिली आहे. ‘सगळ्यांना नमस्कार! माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मी त्या सगळ्यांना विनंती करतो जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली काळजी घ्यावी. चाचणी […]

तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जूनने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्याने स्वतः आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवर आपण विलगीकरणात असल्याची माहिती दिली आहे.

‘सगळ्यांना नमस्कार! माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मी त्या सगळ्यांना विनंती करतो जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली काळजी घ्यावी. चाचणी देखील करून घ्या. मी सगळ्या शुभचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, घरी राहा सुरक्षित राहा’, असं ट्विट अल्लू अर्जुनने केलं आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number