Bihar Politics : ‘लवकरच बिहार सरकार कोसळणार’; बांकीपूरमधील NDA च्या बैठकीदरम्यान तेज प्रताप यादव यांचा खळबळ दावा

पटना : बिहारच्या राजकारणात खळबळ माजवणारे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी बिहारमधील सरकारबाबत मोठा दावा केला आहे. बिहारचं सरकार लवकरच कोसळेल असे, तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत बिहारच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी […]

Bihar Politics : ‘लवकरच बिहार सरकार कोसळणार’; बांकीपूरमधील NDA च्या बैठकीदरम्यान तेज प्रताप यादव यांचा खळबळ दावा

पटना : बिहारच्या राजकारणात खळबळ माजवणारे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी बिहारमधील सरकारबाबत मोठा दावा केला आहे. बिहारचं सरकार लवकरच कोसळेल असे, तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत बिहारच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाले, तर नितीश कुमार हे राज्यसभेवर गेले आहेत. तसेच नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांची मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

हेही वाचा : Loan Waiver: बळीराजाला मोठा दिलासा! कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून थेट ‘इतक्या’ लाखांपर्यंत वाढवली; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 बांकीपूरचे भाजप उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तेजप्रताप यांनी हा दावा केला आहे. शुक्रवारी तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “बिहारमध्ये खूप लवकर सरकार कोसळणार आहे, आणि नितीश कुमार यांनी सम्राट म्हणत मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते, भविष्यवाणी केली होती. मी आता वृंदावनमध्ये आहे, खूप लवकर बिहारमधील सध्याचे सरकार बदलेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number