Chhagan Bhujbal : "उड्डाण घेणार तितक्यात…" राज्यातील नेत्यांच्या मागे लागलंय शुक्लकाष्ठ? मुंडेनंतर भुजबळांसोबतही घडला तो भीतीदायक प्रसंग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळ्याला धुळ्यात येण्यापुर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Chhagan Bhujbal : &quotउड्डाण घेणार तितक्यात…&quot राज्यातील नेत्यांच्या मागे लागलंय शुक्लकाष्ठ? मुंडेनंतर भुजबळांसोबतही घडला तो भीतीदायक प्रसंग

आज स्वराज्याचे संस्थापक आणि आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यातील नेतेमंडळी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा- Supriya Sule : अजितदादांच्या मृत्यूवर रोहित पवारांचे खळबळजनक दावे; सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली मोठी मागणी

यावेळी धुळ्यात येण्यापुर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल त्यांनी स्वतः माहिती देत सांगितले की, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाच्या लँडिंगला वैगरे प्रॉब्लेम झाला असता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता राज्यात सर्वच राजकीय नेत्यांच्या विमानांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

हेही वाचा- Sunetra Pawar : शब्द जड झाले, कंठ दाटून आला; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं शिवनेरीवर पहिलंच भाषण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन
बुधवारी 28 जानेवारीला सकाळी 8.44 च्या सुमारास राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच दुसरीकडे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरक्षिततेबाबत दोन वेळा चिंता व्यक्त केली जात आहे. आधी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघालेल्या असताना त्यांच्या विमानातील तांत्रिक बिघाड उड्डाणापूर्वीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पुन्हा त्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्याला जाण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. अस असताना आता मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबतही मोठा अनर्थ होता होता टळला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number