Under 19 world cup : सर्वाधिक वेळा फायनलमध्ये धडक मारण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर

अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर १० विकेटने विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या दोघांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने सर्वाधिक वेळा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची कामगिरी केली आहे. फायनलमध्ये पोहचण्याची टीम इंडियाची […]

Under 19 world cup : सर्वाधिक वेळा फायनलमध्ये धडक मारण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर

अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर १० विकेटने विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या दोघांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

टीम इंडियाने सर्वाधिक वेळा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची कामगिरी केली आहे. फायनलमध्ये पोहचण्याची टीम इंडियाची ही ७ वी वेळ आहे.

तसेच सर्वाधिक वेळा अंडर १९ वर्ल्ड कप विजेतेपद जिंकण्याची कामगिरी ही टीम इंडियाने केली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत ४ वेळा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ३ वेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली आहे. पाकिस्तान संघानेही २ वेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकण्यास यश आले आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमने प्रत्येकी ५ वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे.  

अंडर १९ वर्ल्ड कप फायनल खेळणाऱ्या टीम  

टीम इंडिया – एकूण ७ वेळा, (२०००, २००६, २००८, २०१२, २०१६, २०१८, २०२०)

ऑस्ट्रेलिया – एकूण ५ वेळा, (१९८८, २००२, २०१०, २०१२, २०१८)

पाकिस्तान- एकूण ५ वेळा, (१९८८,२००४, २००६, २०१०, २०१४)

दक्षिण अफ्रीका- 3 वेळा, (२००२, २००८, २०१४)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number