चहाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे मागील काही दिवसांपासून अनेक गोष्टी महागल्या आहे. तर या महागाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागली आहे. अशातच आता अनेकांचा आवडता कटिंग दोन रुपयांनी महागणार आहे. राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय टी-कॉफी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे. राज्यात बुधवारपासून दुधाच्या दरात वाढ झाली. त्यानंतर आता दूध दरवाढीनंतर चहाचा दरही वाढवण्यात आला आहे. १० रुपयांना […]

चहाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे मागील काही दिवसांपासून अनेक गोष्टी महागल्या आहे. तर या महागाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागली आहे. अशातच आता अनेकांचा आवडता कटिंग दोन रुपयांनी महागणार आहे. राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय टी-कॉफी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे.

राज्यात बुधवारपासून दुधाच्या दरात वाढ झाली. त्यानंतर आता दूध दरवाढीनंतर चहाचा दरही वाढवण्यात आला आहे. १० रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता १२ रुपयांना मिळणार आहे.

दूधाच्या दरात वाढ

ग्राहकांना प्रति लिटर दुधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून जे दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलीटर वाढवून देण्यात येणार आहेत. हा निर्णय राज्य सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कॉफीच्या किंमतीत वाढ

कॉफीच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. ब्रु काँफीच्या किंमतीमध्ये ३ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ब्रु गोल्ड कॉफीच्या किंमतीत ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number