Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच… ‘तपोवन’ प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा

अजित पवार यांनी पर्यावरण समतोल राखत समोपचाराने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. हा वाद नाशिकमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच… ‘तपोवन’ प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा

मुंबई: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होणार असल्याच्या निर्णयाने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारने सर्व वृक्ष तोडण्यास मान्यता दिल्यानंतर सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, तसेच विविध अभिनेते यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत हा निर्णय धारेवर धरले आहे. या वाढत्या वादात आता सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली अधिकृत भूमिका मांडत या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया X वरून प्रतिक्रिया देत पर्यावरणसंतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि तपोवनातील मुद्द्यावर समोपचाराने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.”

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही सोशल मीडियावर तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली असून, पर्यायी जागा उपलब्ध असताना हिरवीगार वृक्षसंपत्ती नष्ट करण्याचा अट्टहास का, असा सवाल उपस्थित केला आहे.

NCP प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी लिहले आहे “तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर. पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे म्हणून त्याला तपोवन असे नाव पडले. ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करत असत. हिरवीगार झाडं असलेला हा परिसर तोडण्याचा घाट सत्तेतेल्या काही लोकांनी घातला आहे. खरं तर जवळच पर्यायी जागा उपलब्ध असताना वृक्ष तोडून त्याच ठिकाणी व्यवस्था करण्याचा अट्टहास का?

हेही वाचा: Rajnath Singh: ‘नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…’ राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

त्यांनी पुढे लिहले आहे, “हजारो किलोमीटर वरून येणारे भाविक दहा–पंधरा किलोमीटर अंतरावर राहू शकतात, चालत जाऊन स्नान करू शकतात. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळाव्यात अनेक लोक 30 किलोमीटर पायी जाऊन शाही स्नान केलेले आहेत. मग आपल्या इकडेच दहा-पंधरा वर्षांची जुनी वृक्ष तोडून तपोवनातच व्यवस्था का करावी वाटतेय? तपोवनातील वृक्ष तोडून त्याबदल्यात दुसरीकडे तेवढीच नवीन वृक्ष बाहेरून आणून का लावू असं गिरीष महाजनजी म्हणतायत? आहेत ती झाडं जपायची सोडून जुनी तोडायची आणि दुसरीकडे नवीन झाडं लावायची हा कार्यक्रम कशासाठी?”

शेवटी चव्हाण यांनी सरकारला उद्देशून लिहले आहे की, “वृक्षप्रेमी म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे या वृक्षतोडीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.”

या सर्व घडामोडींमुळे तपोवनातील वृक्षतोड हा केवळ प्रशासनाचा निर्णय न राहता एक व्यापक सामाजिक आणि राजकीय मुद्दा बनला आहे. पर्यावरण, परंपरा आणि विकास यांचा समतोल साधत अंतिम निर्णय कसा घेतला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis Met Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस-संजय राऊतांची 20 मिनिटांची भेट! आशिष शेलारही बाजूला; चर्चेत नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number