ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; नेतेमंडळींकडून राज-उद्धव एकत्रीकरणावर प्रतिक्रिया

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; नेतेमंडळींकडून राज-उद्धव एकत्रीकरणावर प्रतिक्रिया

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी मुलाखतीत केलं आहे.  महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज यांनी प्रस्ताव दिला आहे. मी सोबत काम करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलं आहे. किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असं ठाकरेंनी म्हटलंय, मात्र त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत. यावर महाराष्ट्रात चर्चांणा उधाण आले आहे. 

अटीशर्ती घालणाऱ्यांवर मी का बोलू ? असा टोला ठाकरे बंधू एकत्रीकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दोन भाऊ एकत्रित आले तर आनंदच असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तर चंद्रकांत वैद्य यांनी भाऊ सोबत येणं महाराष्ट्राच्या हिताचं असल्याची प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : Sanjay Raut : ठाकरे बंधुंच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन

ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाचं पोट दुखतंय? अशी मिश्कील प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज ठाकरेंनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. तसेच पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांशी 5-10 दशकांचे कौटुंबिक संबंध आहे. राज-उद्धव दोघेही आम्हाला प्रिय आहेत. बाळासाहेब असते, तर त्यांना आनंद झाला असता असे मत व्यक्त केले आहे. 

राज यांची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. उद्धव ठाकरेंनी नेहमीच महाराष्ट्र हिताची भूमिका घेतली आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधुंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तुम्ही आम्हाला वाईट ठरवून एकत्र येऊ शकत नाही अशी देशपांडेंची ठाकरेंच्या सशर्त प्रस्तावावर रोखठोक भूमिका आहे. आदित्य ठाकरेच चंद्रकांत पाटलांसोबत चॉकलेट खातात.ठाकरे गटावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. ठाकरे गटाने आमची वेळोवेळी फसवणूक केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचा फायदा अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. युतीचा निर्णय राज ठाकरे-उद्धव ठाकरे घेतील. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगली बाब अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिली. तसेच चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचे काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर सुवर्णक्षण आहे. मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे पवार गटाचे आमदार रोहत पवार यांनी म्हटले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number