Afghan Embassy in Delhi : तालिबानचा ‘पावरफुल’ अधिकारी दिल्लीत; भारतातील दूतावासात अफगाणिस्तानकडून नूर अहमद नूर यांची नियुक्ती

तालिबानने सत्ता घेतल्यानंतर पहिल्यांदाच तालिबान सरकारने नियुक्त केलेले राजनैतिक प्रतिनिधी भारतात कार्यभार स्वीकारणार आहेत.

Afghan Embassy in Delhi : तालिबानचा ‘पावरफुल’ अधिकारी दिल्लीत; भारतातील दूतावासात अफगाणिस्तानकडून नूर अहमद नूर यांची नियुक्ती

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानने नियुक्त केलेले राजनैतिक प्रतिनिधी भारतात कार्यभार स्वीकारणार आहेत. तालिबान सरकारने नियुक्त केलेले मुफ़्ती नूर अहमद नूर हे भारतात दाखल झाले असून, ते लवकरच नवी दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावासाचे चार्ज द’अफेअर्स (Charge d’Affaires) म्हणून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तालिबानच्या सत्ताकाळात भारतात जबाबदारी स्वीकारणारे ते पहिले राजनैतिक अधिकारी ठरणार आहेत.

ही घडामोड ऑक्टोबर 2025 मध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सरकारचे कार्यवाह परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यानंतर घडली आहे. त्या दौऱ्यादरम्यान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात राजनैतिक पातळीवर काही महत्त्वाच्या समजुती झाल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून मुफ़्ती नूर अहमद नूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: Donald Trump : व्हाईट हाऊसचा खोटारडेपणा भारताने केला उघड; एका वर्षात 8 वेळा चर्चा होऊनही म्हणे…

मुफ़्ती नूर अहमद नूर हे तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत. ते याआधी काबूलस्थित अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of Foreign Affairs, MFA) पहिल्या राजकीय विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. भारत दौऱ्यावर आलेल्या अमीर खान मुत्तकी यांच्या शिष्टमंडळातही ते सहभागी होते. या दौऱ्यात त्यांनी उत्तर प्रदेशातील देओबंद येथील दारुल उलूम मदरशालाही भेट दिली होती, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले होते.

आतापर्यंत नवी दिल्लीतील अफगाण दूतावासाची जबाबदारी मोहम्मद इब्राहिमखिल यांच्याकडे होती. ते माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या सरकारकाळात हैदराबाद येथे कॉन्सुल जनरल म्हणून नियुक्त झाले होते आणि दिल्लीतील दूतावासाचे चार्ज द’अफेअर्स म्हणून काम पाहत होते. आता मुफ़्ती नूर अहमद नूर यांच्या आगमनानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

तालिबान सरकारला भारताने अद्याप औपचारिक मान्यता दिलेली नसली, तरी या नियुक्तीमुळे भारत – अफगाणिस्तान संबंधांमध्ये एक नवा टप्पा सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मानवी मदत, व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील संवाद अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंसोबत 14 ठिकाणी भाजपची युती नाही'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number