T-20 WC, INDvsENG, semi final : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

महिला टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड विरुद्ध ५ मार्चला सेमीफायनल मॅच खेळण्यात येणार होती. पंरतु पावसाच्या व्यत्ययामुळे ही सेमी फायलन मॅच होऊ शकली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम सामन्याचं तिकीट मिळालं आहे. टीम इंडियाला पाँइट्स टेबलमधील स्थानानुसार टीम इंडियाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला आहे. या चारही विजयामुळे टीम इंडियाचे […]

T-20 WC, INDvsENG, semi final : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

महिला टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड विरुद्ध ५ मार्चला सेमीफायनल मॅच खेळण्यात येणार होती. पंरतु पावसाच्या व्यत्ययामुळे ही सेमी फायलन मॅच होऊ शकली नाही.

त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम सामन्याचं तिकीट मिळालं आहे.

टीम इंडियाला पाँइट्स टेबलमधील स्थानानुसार टीम इंडियाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला आहे.

या चारही विजयामुळे टीम इंडियाचे एकूण ८ गुण आहेत.

टीम इंडियाने साखळी फेरीतील ४ ही सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाने साखळी सामन्यातील चारही सामन्यात विरोधी संघाला पराभवाची धूळ चारली आहे.

टीम इंडियाने अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी, बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला.

तिसऱ्या सामना अटीतटीचा झाला. न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा अवघ्या ३ धावांनी विजय झाला होता. तर चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा टीम इंडियाने ७ विकेटने विजय मिळवला होता.

महिला टीम इंडियाची अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ३ वेळा (2009, 2010, 2018 )धडक मारली होती.

परंतु तीनही वेळा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान दुसरा उंपात्या सामना आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात येणार आहे. या मॅचमध्ये देखील पावसाच्या अडथळ्यामुळे मॅच होऊ शकली नाही, तर पॉइंट्सच्या आधारावर टीम आफ्रिकेला फायनलचं तिकीट मिळेल.

अंतिम फेरीत प्रवेश मिळाल्याने टीम इंडिया आता विश्वविजेता होण्यापासून अवघ्या एक पाऊल दूर आहे.

टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारल्याने महिला टीमचं अनेक माजी खेळाडूंकडून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

वीरेंद्र सेहवाग याने ट्विट केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number