Sushma Andhare on Rupali Chakankar : ‘रुपाली चाकणकरांनी स्वत:ची अनामिका कापली आणि…’, ‘ते’ भयंकर फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचेदेखील अनेक फोटो समोर आले आहेत.

Sushma Andhare on Rupali Chakankar : ‘रुपाली चाकणकरांनी स्वत:ची अनामिका कापली आणि…’, ‘ते’ भयंकर फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा  सुरू आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये  त्या अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला आहे.. त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचेदेखील अनेक फोटो समोर आले आहेत. यावरून रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. 

 या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली होती. एका पीडितेने सांगितलं की रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. त्यांच्या हाताला बॅंडेज लावलेले देखील दिसत आहे”. 

 हेही वाचा – Ashok Kharat Case: भोंदू बाबा खरातचं ‘बिंग’ कसं फुटलं? पाच कोटींची खंडणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तो ऑफिस बॉय, काय घडलं नेमकं? 

पुढे त्या म्हणाल्या की, ” त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक करुन त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. चाकणकरांचा घरात खरात यांची भाची राहते”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

 हेही वाचा – Dhananjay Munde: ‘मला संपवण्यासाठी महाराष्ट्रातले ‘मोठे नेते’ एकवटले होते’; धनंजय मुंडेंचा भरसभेत खळबळजनक गौप्यस्फोट 

नंतर त्या म्हणाल्या की,  “रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे.  रूपाली चाकणकर राजकीय दबाव वापरू शकतात. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे, असं शेवटी सुषमा अंधारे म्हणाल्या. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number