मुंबई : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकर अटक करणे आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरखधंद्याला चाप बसविणे यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील राजकारणावर तिखट टीका केली. विशेषतः, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आक्रमक शब्दात टीका केली आणि परळी पॅटर्नचा उल्लेख केला.
सुरेश धस यांनी परळीतील राजकारणाचे वर्णन करत, तेथे इव्हेंट मॅनेजमेंटचे स्वरूप असले असल्याचे सांगितले. त्यानुसार, परळीतील बेकायदेशीर जमिनींवर ताबा मिळवून विटभट्ट्या आणि अवैध बांधकामांचे संचालन सुरू आहे. या आर्थिक फायद्याचा उपयोग इव्हेंट मॅनेजमेंटसाठी केला जातो आणि त्यामध्ये सेलिब्रिटींचा सहभाग वाढवला जातो. सुरेश धस यांनी यासाठी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचे नाव घेतले. त्यांनी चांगले इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असल्यास परळीत यावे आणि या घटनांचा प्रसार देशभर व्हावा, अशी खोचक टीका केली.
सुरेश धस पुढे म्हणाले, "जर कुणाला चित्रपट काढायचे असेल तर अशा मोठ्या विभूतींवर चित्रपट काढता येईल. प्राजक्ताताई माळीही आमच्या परळीत येतात. परळी हा एक खास पॅटर्न आहे," अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सेलिब्रिटी येत असतात त्यांच्या तारखा कशा मिळवल्या जातात यावररही सुरेश धस यांनी वक्तव्य केलं.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.