Supriya Sule : ‘तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय…’, सातारा प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा संताप

शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून मारहाण करण्यात आली. आता यावरून सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे.

Supriya Sule : ‘तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय…’, सातारा प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा संताप

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून मारहाण करण्यात आली. आता यावरून सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एपुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शंभुराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर याची चाैकशी व्हायला पाहिजे, दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय. पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत, महाराष्ट्रामध्ये. तेही मित्र पक्षांनाच ते त्यांचे मित्र पक्षच आहेत ना? असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात.  सातारा प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले.  त्याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते? या घटनेचा निषेधच आहे. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार.

हेही वाचा – Government Officer Beaten: संगमनेरमध्ये राडा; पंचायत समितीत अधिकाऱ्याला बेदम मारहाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गुन्हा दाखल 

पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, “मी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली. कारण दिल्लीतील वर्मतमान पत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. पण महाराष्ट्रासाठी हे दुर्देव आहे, जी काही साताऱ्याच घटना झाली. लोकशाहीची हत्या आहे. हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा विषयच नाहीये”.

हेही वाचा – रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशसच्या मोका येथे ‘महाराष्ट्र भवन’ विस्तारित वास्तूचा शिलान्यास 

“ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय आहे. उद्या परत 10 ठिकाणी होईल, मुळात म्हणजे असे करणेच चुकीचे आहे. मी शंभूराजेंनाही फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number