महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीने शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आभार मानले आहेत.
दरम्यान पार्थ पवार हे यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार आहेत, यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार हे पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. तुमच्याकडे देखील लोकसभेचा प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून तुम्ही पार्थ पवार यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यत आला.
राज्यसभेत आणि लोकसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल, तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं. कारण तिथे जे व्यक्ती बसले आहेत, ते आपल्या पेक्षा जास्त जाणतात, आणि संपूर्ण देश आपल्याकडे बघत असतो. त्यामुळे हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.