राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवरून पक्षात नवा वाद निर्माण झाला आहे. झारखंड प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत नोटीस बजावल्यानंतर पक्षात सध्या मोठे वादळ उठले आहे. एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. या नोटीसवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता याच प्रकरणावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
यावर सुनिल तटकरे म्हणाले की, "सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीशीत तथ्य नाही आहे. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी लावलेली बैठक नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करु. माझा व्यक्ती सोबत संवाद नाही. दिल्लीत त्यांच्यासोबत कोणाचा संवाद झाला असेल तर ते मला माहिती नाही. याप्रकरणी कायदेशीर वैधता तपासावी लागेल. मला वैयक्तिगत वाटत नाही, यात काही तथ्य आहे. "
"एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड झाली आहे. पक्ष एकसंघ पणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील काम करतोय. दादा नाहीत हे सहन होत नाही. तरी सप्ताहात विविध कामं उपक्रम करु. ज्या वेळेला वेगवेगळ्या सूचना येतात तेव्हा वेगळ्या आहेत असं मानण्याचे कारण नाही. लोकशाही माध्यमातून आम्ही काम करतोय. कोणी कोणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही." तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेलं अर्थखातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. यावर तटकरे म्हणाले की, गेले काही दिवस अधिवेशन चालू होतं. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आम्ही लवकरच हा प्रश्न मार्गी लावू.