NCP Sunil Tatkare On Navneet Rana : "नवनीत राणा हा विषय…" नवनीत राणांच्या राष्ट्रवादीतील राज्यसभा उमेदवारीवर तटकरेंची थेट प्रतिक्रिया

सुनेत्रा पवारांनंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेच्या मुद्द्यावरून राजकारण खवळून आलं होत. नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवरती जाणार अशी चर्चा होती. यावर तटकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

NCP Sunil Tatkare On Navneet Rana : &quotनवनीत राणा हा विषय…&quot नवनीत राणांच्या राष्ट्रवादीतील राज्यसभा उमेदवारीवर तटकरेंची थेट प्रतिक्रिया

रायगडच्या सुतारवाडीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली या बैठकीत खासदार सुनील तटकरे,मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते. दरम्यान सध्या सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाला मिळणार? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची वर्णी राज्यसभेवर लागणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुनेत्रा पवार यांच्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण खवळून आलं होत. नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवरती जाणार अशी चर्चा होती. 

याचपार्श्वभूमिवर नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट करून सांगितले आहे. रोहित पवार यांना फटकारत नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपलेला आहे असं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक संध्याकाळी होईल. त्या संदर्भातला अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ, आम्हाला सल्ले द्यायचे बंद करा, तुमच्या पक्षात काय चाललय ते आधी बघा’ असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवार यांना सुनावले आहे. 

हेही वाचा- Rajya Sabha Election 2026: महायुतीचा सस्पेन्स वाढला! छगन भुजबळांच्या आग्रही मागणीवर आज रात्री होणार मोठा निर्णय

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये कमालीची राजकीय उत्कंठा निर्माण झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रबळ दावा ठोकला असून, या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु असताना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीतील नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली होती.

सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणा यांना मिळण्याची शक्यता वर्तावली जात होती. याचपार्श्वभूमिवर राणा दांपत्यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती, तसेच नवनीत राणा यांनी काल सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा करण्याची रणनीती आखल्याचे पहायला मिळत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत “नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपलेला आहे,” असे स्पष्ट केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number