राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची चर्चा सुरु असताना आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भेटीच कारण गुलदस्त्यात
दोन दिवसांपूर्वीच खासदार पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता सुनील तटकरे मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मागच्याच आठवड्यात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांनी सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची अचानक पणे भेट घेतली होती. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकारिणीत नव्याने बदल केल्याने सुनील तटकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
पुढच्या आठवड्यात महायुतीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या सुनील तटकरे यांची शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटीगाठी मूळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.