Sunil Tatkare: सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंवर 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा; काय आहे नेमकं प्रकरण?

थोरवे यांनी तटकरे यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा तसेच कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या मारले जात असल्याचा आरोप केला होता.

Sunil Tatkare: सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंवर 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा; काय आहे नेमकं प्रकरण?

रायगड: शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (दिवंगत अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. माणगाव सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात एकूण 65 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात काही टीव्ही चॅनल्स, तसेच गुगल आणि गुगल एलएलसी यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रायगडमध्ये रक्तरंजित वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यामागे सुनील तटकरे असल्याची टीका त्यांनी केली होती.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime : बँक खातं भाड्यावर? छत्रपती संभाजीनगरमध्ये फ्रॉडसाठी वापरला जातोय नवा फंडा, तुम्हीही चक्रावाल

थोरवे यांनी तटकरे यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा तसेच कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या मारले जात असल्याचा आरोप केला होता. या विधानांमुळे प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत सुनील तटकरे यांनी अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. निवडणुकीनंतर लगेचच ही घटना घडल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. त्या घटनेनंतर माध्यमांवर प्रतिक्रिया देताना महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद रायगडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असून दोन्ही पक्षांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्राथमिक टप्प्यावर असून आगामी काळात दोन्ही बाजूंचे वकील न्यायालयात कशा प्रकारे युक्तिवाद करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: North Korea Attack : आखाती युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाचाही क्षेपणास्र हल्ला, दक्षिण कोरिया-जपान सतर्क

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number