Sunil Tatkare : "पालकमंत्रीबाबत 15 ऑगस्ट निर्णय" रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादीतील संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

Sunil Tatkare : &quotपालकमंत्रीबाबत 15 ऑगस्ट निर्णय&quot रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. अशातच एकीकडे प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णायक संकेत मिळत आहेत. येत्या 15 ऑगस्टला मंत्री भरत गोगावले रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याची माहिती समोर आली. मात्र भरत गोगावले यांचे पालकमंत्री पद तरी देखील लांबणीवर असल्याची चर्चा देखील सुरु होती. प्रशासकीय स्तरावर पालकमंत्री पदाच्या संदर्भात कोणत्याही हालचाली अद्याप तरी नसल्याची सुत्रांची माहिती समोर आली. त्यामुळे 15 ऑगस्ट आधी पालकमंत्री पदाचा तिढा सुटतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

15 ऑगस्ट पालकमंत्रीबाबत निर्णय
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 15 ऑगस्ट पालकमंत्रीबाबत निर्णय घेतील. NDA च्या सर्व खासदार यांची बैठक मंगळवारी होती.. काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांना मोदी भेटले. ते सर्वांशी चर्चा करतात.. नव्यवणे निवडून आलेलं त्यांना भेटतात. नव्या तरुणाईशी ते इन्स्टाग्रामवर बोलताना दिसता. विक्रम काकडे यांची साडीच्या भेट घेणे आणि बोलावणे हा फरक आहे.. पद्मविभूषण बाबत पत्र दिले आहे.. आमच्यासर्वांचा भावनप्रधान भाग आहे… सर्वांची इच्च आहे.. जशी संधी मिळाले तसे ते मांडतात.. जनतेच्या भावना आहेत..”

“प्रशांत किशोर यांची निवडबाबत माहीत नाही.. काय चर्चा झाली माहीत नाही.. थिएरिकल पेक्षा आम्ही प्रॅक्टिकल आहे. पार्थ, पवारसाहेब, वसंत दादा प्रॅक्टिकल आहोत. मला रणनितीकर आणि सर्वे ची गरज नाही मी फिल्डवरचा माणूस आहे.. पवारसाहेब आणि दादा यांच्यासोबत काम केले आहे.. 8 वर्षे महाराष्ट्र पालथा घातलाआहे.. ते आमच्यापक्षासाठी काम करत आहे याची कल्पना नाही.. आम्ही पक्षाचे संघटन बांधत असताना आम्ही प्रॅक्टिकल वागत आहे.. त्यांना नेमले आहे साडीच्या भेट घेतल्यावर त्यांना नेमल्याचे म्हणणे चुकीचे. सदिच्छा भेट झाल्याचे होते.. दादा यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले तेव्हाही आम्ही NDA , भाजप आणि मित्रपक्षसोबत आहोत असे विश्लेषण केले.. यासोबतच आम्ही पुढे वाटचाल करणार. मला सर्वे ची गरज नाही… पण गेल्या काही वर्षापासून सर्वे केला जात आहे.. त्यात अंदाज येतो.. 2014 ची निवडणूक ही आमच्या राष्ट्रवादीच्या करियरमधली चॅलेंजिंग निवडणूक होती कारण सगळे पक्ष स्वतंत्र लढले.. आमच्यावर आरोप होते. आम्ही प्रत्येक निवडणुकीत मेहनत घेतली आहे.. पवार साहेबांना एक एक तालुक्यातील 10 ते 15 लोकांची नावे माहीत आहे.. दादा यांनी पण काम केले. आमच्या अनुभव आणि सर्व्हे यातून नेमके काय केलं पाहिजे याचा अंदाज होती. डिझाइन box ने केलेली थीम असेल पण फक्त थीम वर काम नाही चालत.. आम्ही प्रॅक्टिकल मेहनत केली..”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number