Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून राष्ट्रवादीत नवा वाद; ‘नोटीसला उत्तर देणार नाही’, अनिल पाटील ठाम

झारखंड प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत नोटीस बजावल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अनिल पाटील यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून राष्ट्रवादीत नवा वाद; ‘नोटीसला उत्तर देणार नाही’, अनिल पाटील ठाम

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवरून पक्षात नवा वाद निर्माण झाला आहे. झारखंड प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत नोटीस बजावल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार अनिल पाटील यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली.

अनिल पाटील यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती पक्षाच्या संविधानातील सर्व तरतुदींचे पालन करूनच करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नसल्याचा दावा त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या संविधानात अशा प्रकारच्या वादांवर तोडगा काढण्यासाठी अंतर्गत यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही सदस्याला किंवा पदाधिकाऱ्याला थेट न्यायालयात जाण्याचा अधिकार संविधानात देण्यात आलेला नाही. त्यामुळे झारखंड प्रदेशाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटीसला उत्तर देण्याची कोणतीही गरज पक्षाला वाटत नाही. "ही नोटीस वस्तुस्थितीशी विसंगत असून ती केवळ संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याचे किंवा उत्तर देण्याचे कोणतेही कारण नाही," असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरू झाली असून, पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number