Sunetra Pawar : ‘पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा…’, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शरद पवारांसाठी खास पोस्ट

त्यांच्या संसदीय जीवनाला 60 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे.

Sunetra Pawar : ‘पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा…’, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शरद पवारांसाठी खास पोस्ट

राजकारणात शरद पवार यांच्या नावाची ख्याती मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाला आज 60 वर्षे पूर्ण झाली. त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच खूप चर्चेत राहिला आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या काळातला एक फोटोदेखील सुनेत्रा पवार यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. 

हेही वाचा – Vijay Wadettiwar on Ladki Bahin Yojana : ‘कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय…’, पत्रकार परिषदेदरम्याने विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल 

पुढे त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा”. 

हेही वाचा – Waris Pathan on Love Jihad : आता लग्नासाठी भाजपाची परवानगी घ्यावी लागणार का? वारिस पठाण यांचा सरकारला सवाल 

आमदार रोहित पवार यांनीदेखील शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. “संसदीय कारकिर्दीच्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले देशातील एकमेव नेते आदरणीय पवार साहेब! साहेबांची ही ऊर्जा लाखो कार्यकर्त्यांसाठी कायम प्रेरणा देत राहो, ही सदिच्छा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number