राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. दरम्याने दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे.
मात्र यावेळी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही.
हेही वाचा – Sunetra Pawar: भल्या पहाटे सुनेत्रा पवार मुंबईत दाखल, आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
या सर्व कारणांमुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोलल्याच दिसून येत आहे. दरम्याने सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चाला थांबल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.