बस चालकाची आत्महत्या

कवठेमहांकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या राहत्या घरीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण मार्गावर ते चालक पदावर काम करत होते. राज्यात एस्टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती झाला नसल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे मात्र या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले […]

बस चालकाची आत्महत्या

कवठेमहांकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या राहत्या घरीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण मार्गावर ते चालक पदावर काम करत होते. राज्यात एस्टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती झाला नसल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे मात्र या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कवठेमहंकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी 360 कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्यानं महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकीत रक्कम मागितली होती. मात्र, अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात आज (16 फेब्रुवारी) अर्थ, परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारनं कोर्टात दिले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number