मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलं. याच पार्श्ववभूमीवर महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. याच अनुषंगाने आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे. यातच आता सर्वचं लक्ष लागून आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण विराजमान होईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला 40 हजार उपस्थितांची संभाव्य संख्या आहे तर 22 अन्य राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री व भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
काय आहे तयारी?
1. तीन व्यासपीठ
2. भव्य मंच
3. 60 बाय 100, 80 बाय 50, 80 बाय 50 चे 3 मंच
4. एकूण तीन प्रवेशद्वारे
5. कार्यकर्त्यांसाठी बैठक व्यवस्था
मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शपथविधी संदर्भात आढावा बैठक घेतली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे. तर मुंबईतील भाजपच्या आमदारांकडे या शपथविधी सोहळ्याची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.