बीडमध्ये शिउबाठाला खिंडार 

शिउबाठाला बीडमध्ये खिंडार पडली आहे. महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

बीडमध्ये शिउबाठाला खिंडार 

१० ऑगस्ट, २०२४, बीड : शिउबाठाला बीडमध्ये खिंडार पडली आहे. महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. 
पक्ष सोडताना संगीता चव्हाण यांनी शिउबाठा नेता सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'पदासाठी सुषमा अंधारे पैसे घेतात आणि त्यांनी शिवसेना पक्ष संपवण्यासाठी कोणाची तरी सुपारी घेतली आहे', असा आरोप त्यांनी केला आहे. यापुढे शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यावर जर आरोप केला तर चोप दिला जाईल असा खणखणीत इशाराही संगीता चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सुषमा अंधारे यांना रोखण्यासाठी संगीता चव्हाण या पुढे येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number