रेल्वे प्रशासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे पास असणे बंधनकारक केले आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थ उमेदवार, तसेच कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी उमेदवार, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे पास असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी उमेदवार, तसेच परीक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबतचे पत्र राज्य शासनतर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले होते. आणि अखेर हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी उमेदवार, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे.