राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात कुंभमेळ्यातील गंगास्नानावर भाष्य केले आहे.

राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात कुंभमेळ्यातील गंगास्नानावर भाष्य केले आहे. यावर आता टीका होताना दिसत आहे. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. देशातील एकही नदी स्वच्छ नाही. अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.गंगा स्वच्छ होणार राजीव गांधींच्या काळापासून ऐकतोय. पण अद्यापही ती स्वच्छ झाली नाही. अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे यांना हिंदूविरोधी लागण झाली असल्याची टीका भाजपा अध्यात्म आघाडीच्या तुषार भोसलेंनी केली आहे. तसेच राज यांच्यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना हिंदूविरोधी लागण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुषार भोसले यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

हेही वाचा : कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

तुषार भोसलेंपाठोपाठ मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही राज ठाकरेंवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. हिंदुत्व दाखवावं लागतं, ते बेगडी नको. राज ठाकरेंचं हिंदुत्व एकट्याचं असल्याची  टीका मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर केली. 

काय म्हणाले राज? 

पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी महाकुंभातील श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर भाष्य केले आहे. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. देशातील एकही नदी स्वच्छ नाही. अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.गंगा स्वच्छ होणार राजीव गांधींच्या काळापासून ऐकतोय. पण अद्यापही ती स्वच्छ झाली नाही. अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला आहे. केवळ मतांसाठी लोकांची माथी भडकवणं सुरू आहे. गुढीपाडवा मेळाव्यात दांडपट्टाच काढणार असल्याचे राज यांनी सांगितले. 14 वर्षात श्रीराम अयोध्येतून लंकेत जाऊन आले. तसेच मुंबईत वांद्रे सी लिंक उभा करायला 14 वर्ष जातात. कोणताही कार्यकर्ता असू द्या काम काम केलं नाही तर पदावरुन हटवणार असल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी घेतला. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम दर 15 दिवसांनी तपासलं जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number