ममता सरकारचा अजब न्याय

शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळच्या सुमारास बालासोर येथे तीन रेल्वेजमध्ये धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १००० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. एकीकडे या अपघातग्रस्तांना अनेकांकडून मदत केली जात आहे. तर दुसरीकडे, ममता सरकारकडून मदत निधीत दोन हजाराच्या नोटा देऊन बालासोर रेल्वे पीडितांची खिल्ली उडविल्याचा प्रकार घडला […]

ममता सरकारचा अजब न्याय

शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळच्या सुमारास बालासोर येथे तीन रेल्वेजमध्ये धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १००० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. एकीकडे या अपघातग्रस्तांना अनेकांकडून मदत केली जात आहे. तर दुसरीकडे, ममता सरकारकडून मदत निधीत दोन हजाराच्या नोटा देऊन बालासोर रेल्वे पीडितांची खिल्ली उडविल्याचा प्रकार घडला आहे.

ओडिशात तीन रेल्वेजची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच मार्गावरून दोन गाड्या विरुद्ध दिशेने आल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला. आणि इतक्या भयंकर अपघातानंतर अपघातग्रस्तांच्या मदतिचा हा देण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. परंतु, ममता सरकारकडून मात्र बालासोर रेल्वे पीडितांची खिल्ली उडविल्याचा लज्जास्पद प्रकार घडला आहे. ममता सरकारकडून मदत निधीत बंद झालेल्या दोन हजाराच्या नोटांनी मदत निधी वाटप करण्यात आला. ममता सरकारचा हा अजब न्याय अतिशय अपमानास्पद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number