Raju Patil : ‘माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा’; मनसे नेते राजू पाटील यांची मागणी

मुंबई : मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी माजी खासदार आणि आमदारांची पेन्शन कायमची बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे. देशभरात आमदार-खासदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद […]

Raju Patil : ‘माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा’; मनसे नेते राजू पाटील यांची मागणी

मुंबई : मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी माजी खासदार आणि आमदारांची पेन्शन कायमची बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे. देशभरात आमदार-खासदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे.

हेही वाचा : Raj Thackeray On Ashok Kharat Case: ‘कुणाची तरी वाट लावण्यासाठी प्रकरणं बाहेर काढली…’; भोंदू खरात प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक

पेन्शन बंद करण्याची मागणी का?

राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (ट्विट) या विषयावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागणीमागील प्रमुख कारण म्हणजे, आगामी काळात देशात होणारी जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number