येत्या २ जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलली असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रकात म्हटले आहे की, गेल्यावर्षी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली असल्यामुळे अनेक उमेदवारांची संधी हुकली होती. त्यामुळे अशा उमेदवारांसाठी २ जानेवारी २०२२ रोजी परीक्षा होणार होती. मात्र नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता या परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत एक परिपत्रक सादर केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे’ त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021