मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज, सोमवारी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयोग अधिकारी दिनेश वाघमारे यांनी मुंबई महापालिकेस इतर महापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्यानुसार पुढील वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजे 15 जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणेजच 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
मुदत संपलेल्या निवडणूक 31 जानेवारीच्या अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन असल्याचे आज पत्रकार परिषद घेण्यात आली.
मतदार, इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांना उद्देशतून काही महत्त्वाच्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या.
ही परिषद विशेषतः महानगरपालिका निवडणूक संदर्भात आहे
२९ महापालिकांसंदर्भातील माहिती यात देण्यात येणार असून त्यामध्ये 27 पालिकेची मुदत संपली आहे
पाच महापालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे
तर चार महापालिकांची मुदत ही 2022 ला संपली आहे
एका प्रभागामध्ये मुंबई महानगरपालिकेत प्रत्येकाला एक मत द्यावे लागेल
एका प्रभागमध्ये 4 उमेदवार आहे
काही भागात 3 तर काही भागात 5 उमेदवार असतील
28 महापालिकांमध्ये 3/5 मत एका प्रभागात द्यावे लागेल
राखीव जागेवर जात प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे
सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र हमी पत्र द्यावा लागेल
ते नसल्याने उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल
एकूण मतदार 3,48,050 हजार असून
यामध्ये 1,66,600 महिला मतदान आहेत.
निवडणुकीसाठी 38 हजार मतदार बूट नेमले जातील
महानगरपालिकेसाठी 10,111 मतदार केंद्र निश्चित करण्यात आले आहेत
यासाठी निवडणूक यादी 1 मे 2024 ची यादी वापरली जात आहे
1 जुलै 2025 ची यादी ही निवडणूक आयोगा काढून आलेली असल्यामुळे त्यांना काही फेरबदल करण्याचा अधिकार नाही
विधानसभा यादीमध्ये नाव आहे, पण प्रभावी यादीमध्ये नाव नाही, अशांना यादीमध्ये नोंद करण्यात येईल
दुबार मतदार संदर्भात जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये दुबार मतदारांकडून लिहून घेण्यात येणार की, त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करता येईल.