Mahayuti Mahamandal Vatap: राज्यातील महामंडळ वाटपावर अखेर शिक्कामोर्तब; भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला असून येत्या महिनाभरात या जागांचे वाटप पूर्ण केले जाणार आहे.

Mahayuti Mahamandal Vatap: राज्यातील महामंडळ वाटपावर अखेर शिक्कामोर्तब; भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?

Mahayuti Mahamandal Vatap: गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी डोळे लावून बसलेल्या महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यातील बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला असून येत्या महिनाभरात या जागांचे वाटप पूर्ण केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, भाजपसह मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना जागावाटप लवकरात लवकर आटोपण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. फडणवीसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीच्या गोटात सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

असा आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला
महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून, त्यानुसार एकूण महामंडळांपैकी सिंहाचा वाटा म्हणजेच 48 टक्के जागांवर भारतीय जनता पक्षाचा (BJP) ताबा असणार आहे. त्याखालोखाल शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) 29 टक्के जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) 20 टक्के जागांवर महामंडळांचे वाटप केले जाणार आहे. 

अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होणार
महायुतीची आगामी काळात होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत महामंडळांमधील सदस्य आणि अध्यक्ष पदांच्या वाटपावर सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3 सदस्यीय बैठकीत या अंतिम यादीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल. यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची वर्णी लावणार आहे.

हेही वाचा – Raju Shetty : 'आधी स्वतःचे मानधन गोठवा, मग जनतेला काटकसरीचे सल्ले द्या;' राजू शेट्टींचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा

विधानपरिषद निवडणुकीनंतर प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता
सध्या राज्यामध्ये विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी (16 नियमित + 1 पोटनिवडणूक) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली, तर 18 जूनलाच राजकीय धामधूम संपेल आणि त्यानंतर लगेचच महामंडळ वाटपाच्या फाईलीला गती दिली जाईल. त्यामुळे आगामी काळात कोणकोणत्या महत्त्वाच्या नेत्यांना महामंडळाचे 'लाल दिवे' आणि अधिकार मिळणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number