‘एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे’; शरद पवारांचे संपकरी आंदोलकांना आवाहन

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन एसटी संपकारी आंदोलकांना केले आहे.   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पवार कुटुंब कार्यक्रमात एकत्र आले. त्यावेळी खा.शरद पवार म्हणाले, ‘एसटी कर्मचारी आणि […]

‘एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे’; शरद पवारांचे संपकरी आंदोलकांना आवाहन

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन एसटी संपकारी आंदोलकांना केले आहे.

  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये पवार कुटुंब कार्यक्रमात एकत्र आले. त्यावेळी खा.शरद पवार म्हणाले, ‘एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांची चर्चा कुठवर आली आहे याची मला कल्पना नाही. त्यासाठी मला सरकारमधील लोकांसोबत बोलावे लागेल. एसटी संघटना संकटात असल्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप पुढे नेण्याची आम्हालाही इच्छा नाही. कर्मचाऱ्यांनी संप पुकारून प्रवाशांना त्रास देणे योग्य नाही असे आमचे मत आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हे सगळे घडत असल्याचे, पवार म्हणाले.

  एसटी कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या हितासाठी आणि लोकांची सेवा सुरू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा संप फार ताणू नये. तसेच न्यायालयानेही हा संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाचा मान राखत एसटी कर्मचाऱ्यांनी संप थांबवून हा विषय संपवावा, असे आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number