ST Bus Fare Hike: शिंदेंच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

ऐन दिवाळी तोंडावर असताना एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ केली होती. मात्र आता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ST Bus Fare Hike: शिंदेंच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

मुंबई: ऐन दिवाळी तोंडावर असताना एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ केली होती. मात्र आता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. 

एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा: DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ ताबडतोब रद्द करण्यात आली आहे. शिंदे यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांना भाडेवाढ रद्द करण्याची सूचना दिली. त्यानंतर एसटी प्रशासनाने तात्काळ भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

दिवाळीच्या सणासाठी लोक एसटी बसने प्रवास करतात.  सध्या खाजगी वाहनांची संख्या वाढली असली तरी देखील लोक सुखकर प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देतात. मात्र याआधीच भाडेवाढ केल्याने एसटी प्रशासनावर लोकांची नाराजी होती. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number