उन्हाळ्यासाठी खास पुदिन्याचा फेसपॅक

मुंबई, २५ एप्रिल २०२३ : उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. दरम्यान पुदिना हा उन्हाळ्याच्या दिवसांत वापरला जाणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला महात्वाचे का ? खाण्याबरोबरच पुदिना आपले सौंदर्य वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पुदिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. पुदिन्यात अनेक पोषणतत्वे असतात त्यामुळें आपल्या चेहऱ्याला फायदा होतो.तर हा फेसपॅक कसा […]

उन्हाळ्यासाठी खास पुदिन्याचा फेसपॅक

मुंबई, २५ एप्रिल २०२३ : उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. दरम्यान पुदिना हा उन्हाळ्याच्या दिवसांत वापरला जाणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला महात्वाचे का ? खाण्याबरोबरच पुदिना आपले सौंदर्य वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पुदिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. पुदिन्यात अनेक पोषणतत्वे असतात त्यामुळें आपल्या चेहऱ्याला फायदा होतो.तर हा फेसपॅक कसा बनवावा हे जाणून घेऊ :

पुदिना आणि काकडीचा फेसपॅक :

पुदिना आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी पुदिन्याची ताजी पाने घ्यावीत आणि १ काकडी घावी. काकडीला खिसुन त्यातून रस काढून घ्यावा.नंतर काकडीचा रस आणि पुदिनाच्या पानांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावून 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा.

पुदिना, तुळस आणि कडुलिंबाचा पॅक :

उन्हाळ्यात पुदिना आणि तुळशीचा पॅकसुध्दा त्वचेसाठी उत्तम असतो . त्यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची ताजी पाने घ्यावीत. त्यानंतर या सगळ्याचे एकत्रित मिश्रण तयार करून घ्यावे आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. मग अर्ध्या तासानी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा.

पुदिना आणि मुलतानी मातीचा फेसपॅक :

उन्हाळ्यात मुलतानी मातीचा फेसपॅक हा अतिशय उत्तम असतो. पण जर यात पुदिन्याचा देखील वापर केला तर आपल्या चेहऱ्याला ङ्कगी फायदे होतात. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने बारीक वाटून घ्यावीत.त्यात एक चमचा मुलतानी माती घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यात चमचाभर दही किंवा मध घालून हे मिश्रण संपुर्ण चेहऱ्यावर लावून घ्यावे.त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. हे नियमितपणे केल्यास चेहऱ्याला फायदा होतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number