Soniya Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; मध्यरात्री रुग्णालयात दाखल, प्रकृती कशी आहे? वाचा सविस्तर

या काळात सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियंका गांधी वाड्रा हेही रुग्णालयात उपस्थित आहेत.

Soniya Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; मध्यरात्री रुग्णालयात दाखल, प्रकृती कशी आहे? वाचा सविस्तर

दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्यामुळे 79 वर्षीय सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणात ठेवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, छातीच्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. डॉक्टर अनूप बासु यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात असून पुढील काही तास निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.

या काळात सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियंका गांधी वाड्रा हेही रुग्णालयात उपस्थित आहेत. कुटुंबीयांसह काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतेही त्यांच्या प्रकृतीविषयी सातत्याने माहिती घेत असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही काळात दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाचा त्रास त्यांना होत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदूषणामुळे सतत खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधीही जानेवारी 2026 मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सहा दिवस सर गंगाराम रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.

हेही वाचा: Mobile Recharge New Rules: मोबाईल रिचार्जचा '28 दिवसांचा' फंडा संपणार; सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश; आता पूर्ण महिनाभर मिळणार…

यापूर्वी जून 2025 मध्ये पोटासंबंधी त्रासामुळेही त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी सुमारे चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते आणि नियमित वैद्यकीय तपासण्या करण्यात येत होत्या.

सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर तो अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेला आहे. 1968 मध्ये त्यांचा विवाह राजीव गांधी यांच्याशी झाला. सुरुवातीला राजीव गांधी यांनी राजकारणापासून दूर राहून विमान चालक म्हणून करिअर निवडले होते. मात्र 1980 मध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.

1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती सोनिया गांधी यांना करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला, मात्र 1998 मध्ये त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत संयुक्त प्रगतिशील आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या वेळी पंतप्रधानपदाची संधी असतानाही त्यांनी ती न स्वीकारता डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. सध्या त्या राज्यसभेच्या सदस्या आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख म्हणून सक्रिय राजकीय भूमिका बजावत आहेत. 

हेही वाचा: Weather Alert: राज्यावर दुहेरी संकट! पुढील 24 तासांत जाणवणार 'हे' बदल; हवामान खात्याचा अंदाज काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number