‘या’ खासदाराच्या अडचणीत वाढ

भाजप खासदाराच्या अडचणीत सापडले आहेत. सोलापुरचे खासदार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले होते. ते जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. यानंतर आता जात पडताळणी समितीने अक्‍कलकोट तहसीलदारांना सोलापूर न्यायालयात फिर्याद देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसटांनी सोलापूर […]

‘या’ खासदाराच्या अडचणीत वाढ

भाजप खासदाराच्या अडचणीत सापडले आहेत. सोलापुरचे खासदार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले होते. ते जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.

यानंतर आता जात पडताळणी समितीने अक्‍कलकोट तहसीलदारांना सोलापूर न्यायालयात फिर्याद देण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार प्रभारी तहसीलदार बाळासाहेब सिरसटांनी सोलापूर न्यायालयात भाजपाचे खासदार डॉ. महास्वामीं विरुद्ध फिर्याद दिली आहे.

यावर सोमवारी 2 मार्चला निर्णयाची शक्‍यता आहे. त्यामुळे डॉ. महास्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number