Smriti Mandhana Engagement: स्मृतीने फिल्मी स्टाईलमध्ये जाहीर केली साखरपुड्याची घोषणा; व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या जोडप्याला पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. रील व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Smriti Mandhana Engagement: स्मृतीने फिल्मी स्टाईलमध्ये जाहीर केली साखरपुड्याची घोषणा; व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी स्मृतीचा एक मजेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, या रीलमधून तिने आपल्या साखरपुड्याची अधिकृत पुष्टी केली आहे. स्मृतीने गुरुवारी आपल्या इंस्टाग्रामवर हा रील पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत टीम इंडियाच्या जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि अरुंधती रेड्डी या खेळाडू दिसत आहेत. सर्वजणी “लगे रहो मुन्ना भाई” या चित्रपटातील “समझो हो ही गया” या गाण्यावर छोटा कोरियोग्राफ्ड डान्स करताना दिसतात. क्लिपच्या शेवटी स्मृती कॅमेऱ्याकडे आपली एंगेजमेंट रिंग दाखवते आणि साखरपुड्याची बातमी स्वतः जाहीर करते.

हेही वाचा: Paithan Accident : पैठणमध्ये भीषण अपघात! वाहनाची जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

स्मृतीच्या या रीलवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने लिहिले, “आज इंटरनेटवरची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे.” दरम्यान, स्मृती आणि पलाशचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार असून सर्व तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जोडीला पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. आपल्या खास शैलीत मोदी यांनी स्मृतीच्या कवर ड्राइव्हची सुंदरता आणि पलाशच्या संगीताची सिम्फनी एकत्र येऊन एक उत्कृष्ट जोडी तयार होत असल्याचे लिहिले. मोदी यांनी आणखी एका रोचक गोष्टीचा उल्लेख केला. नवरा आणि नवरी यांच्या टीममध्ये एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना ठेवण्यात आला आहे. “जीवनाच्या खेळात दोन्ही टीम जिंकाव्यात,” असे त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ही जोडी सांगली येथील त्यांच्या मूळ गावी सात फेरे घेणार आहे. या हाय प्रोफाईल लग्नात क्रिकेट आणि एंटरटेनमेंट जगतातील अनेक मोठी नावे हजेरी लावू शकतात. स्मृती आणि पलाश दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. महिला वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यानंतर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ते विजयाचा आनंद साजरा करताना दिसत होते. आता ही जोडी विवाह बंधनात अडकणार असल्याने त्यांचे चाहते खुश आहेत.

हेही वाचा: Parth Pawar Land Scam : “पार्थ पवारला अडकवण्यामागे तटकरे”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number