स्मृती इराणींनी सरकारी बंगला सोडला

मेठी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंर भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी सरकारी बंगला सोडला.

स्मृती इराणींनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली : अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंर भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी सरकारी बंगला सोडला. याआधी केंद्रीय मंत्री म्हणून स्मृती इराणी २८ तुघलक क्रिसेंट येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होत्या. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नियमानुसार त्यांनी सरकारी बंगल्याचा ताबा सोडला. 

स्मृती इराणींचा अमेठीत काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी पराभव केला. शर्मा दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी झाले. याआधी २०१९ मध्ये स्मृती इराणींनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number