रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच बहिणीने घेतला जगाचा निरोप

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर घट्ट राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावावर देते. भाऊदेखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. परंतु याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला भाऊ आणि बहिणीत कायमचीच ताटातूट झाली. परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. रस्ते अपघातात तिचा मृत्यू […]

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच बहिणीने घेतला जगाचा निरोप

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर घट्ट राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावावर देते. भाऊदेखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. परंतु याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला भाऊ आणि बहिणीत कायमचीच ताटातूट झाली.

परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला.

आज रक्षाबंधन असल्याने काल तिचा भाऊ तिला आणायला अमरावतीला गेला होता.

पल्लवी ही अमरावतीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

चांगलं शिक्षण घेऊन पारिवाराचं, भावाचं नाव मोठं करायचं हे स्वप्न उराशी बाळगणारी पल्लवी काल आपल्या लाडक्या भावासोबत आनंदात राख्या घेऊन घरी येत होती.

परंतु नियतीला काही वेगळेच मान्य असावं.

अशातच वाटेतच अमरावती परतवाडा मार्गावर असणार्‍या जवर्डि फाट्याजवळ एका भरधाव ट्रॅव्हलर्स धडक दिली.

या अपघातात तिची प्राणजोत मालवली, तर भावाला किरकोळ जखमा झाल्या.

पल्लवी ही परिवारात लहान असल्याने ती सर्वांची लाडकी होती. सोबतच तिचा मनमिळाऊ स्वभाव यामुळे ती तिच्या घराच्या परिसरातीलही लोकांची लाडकी होती. परंतु ती अशी अचानक निघून गेल्याने परिसरातील लोकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

“माझा दादा मला उद्या न्यायला येतोय”, “आई दादाला लवकर पाठवशील का?”, “मी छान राख्या आणल्या आहेत”, “दादा मी तुला आवडेल अशी राखी आणली” असं म्हणणारी हक्काची बहीण, आई वडिलांची लाडाची पल्लू ही रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला कायमचीच सोडून गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number