पुण्यात राष्ट्रध्वजाचा अपमान, गायिकेने फेकला तिरंगा

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पुण्यात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना घडली. उमा शांती नावाच्या गायिकेने कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांच्या दिशेने तिरंगा फेकला, असे वृत्त आले आहे. ही कृती म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, असे अनेकांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी पुण्यात धक्कादायक घटना घडली. कोरेगाव […]

पुण्यात राष्ट्रध्वजाचा अपमान, गायिकेने फेकला तिरंगा

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पुण्यात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना घडली. उमा शांती नावाच्या गायिकेने कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांच्या दिशेने तिरंगा फेकला, असे वृत्त आले आहे. ही कृती म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, असे अनेकांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी आहे. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी पुण्यात धक्कादायक घटना घडली. कोरेगाव पार्क येथे शांती पीपल नावाच्या समुहाचा वाद्यवृंद कार्यक्रम सादर करत होता. यावेळी गायिका उमा शांती यांनी तिरंगा प्रेक्षकांच्या दिशेने फेकल्याचे वृत्त आहे. ही कृती व्हिडीओत रेकॉर्ड झाली आहे आणि आता व्हायरल होत आहे.

कोरेगाव पार्कमधील घटनेप्रकरणी वकील आशुतोष भोसले यांनी लेखी तक्रार दिली आहे. मुंढवा पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेऊन तपास सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number