बुलढाणा, १५ मे २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मध्ये पाणी बाणी सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराला तब्बल दहा दिवसाआड नळाला पाणी येत असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिलाशक्तींनी सिंदखेडराजा नगरपालिकेवर मोर्चा काढत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. सिंदखेडराजा शहराला पाणीपुरवठा करण्याकरता तीन महिन्यापूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने बहुतांश भागात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे तात्काळ या पाईप लाईनची दुरुस्ती करावी. तसेच शहरात ठीक ठिकाणी पडलेले खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी यावेळी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दहा दिवसाआड पाणी येत असल्याने महिलाशक्तींची पाण्यासाठी मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे सिंदखेडराजा नगरपालिकेने तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महिला शक्तींकडून देण्यात आला आहे.