Weather Update : आज हवामानात जाणवणार मोठे बदल! अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर…

उन्हाळ्याची तयारी सुरू असताना राज्यातील अनेक भागांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान चित्रच बदलले आहे. अशातच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार आहेत.

Weather Update : आज हवामानात जाणवणार मोठे बदल! अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर…

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने आणि गारपिट्यांनी शेतकऱ्यांचं अक्षरशः जगणं मुश्किल झालं आहे. उन्हाळ्याची तयारी सुरू असताना राज्यातील अनेक भागांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान चित्रच बदलले आहे. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गहू, कांदा तसेच इतर पिकांना फटका बसला आहे.

अशातच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार आहेत. यावेळी गडचिरोली आणि चंद्रपूर येथे वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात कमाल तापमान 21.6 तर किमान तापमान 33.3 अंश सेल्सिअस आहे. तसेच रत्नागिरी येथे कमाल तापमान 33.0 तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे कोकणात आज कोरडे हवामान राहणार असून समुद्रकिनाऱ्यावर वारे वाहतील. तसेच मुंबई ठाणे, पालघरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा- Gold-Silver Rate Today : सोन्याच्या दरात तेजी कायम; चांदीच्या दरातही उसळी, जाणून घ्या आजचे दर
तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये विजांसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील कांदा मातीमोल झाला असून, काढून गोण्यांमध्ये भरलेला कांदा खरेदी करण्यासाठी एकही व्यापारी फिरकत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यावेळी केवळ कांदाच नव्हे, तर मका आणि गव्हाचे भावही मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापूरसह सांगली, सातारा आणि कोल्हापुरात आज कोरडे हवामान आहे. तर राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली.

महाबळेश्वर येथे नीचांकी 13.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट दिला असून सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान 41 ते 42 अंशांपर्यत जाण्याची शक्यता हवेच्या आद्रतेमुळे उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. मराठवाड्यात नांदेड हिंगोलीमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number