सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड

कर्नाटक निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डी. के. शिवकुमार, सिद्धारमय्या आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते जी. परमेश्वर यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड

कर्नाटक निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डी. के. शिवकुमार, सिद्धारमय्या आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते जी. परमेश्वर यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर, सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाटकमध्ये फटाके फोडून निर्णय आगोदरच जल्लोष केला.

कर्नाटकात मुख्यमंत्र्यांबाबत सलग चार दिवस मंथन झाल्यानंतर काँग्रसने निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक सरकार स्थापनेसाठी एकमत केलं आहे. २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number