भाजपापाठोपाठ शिवसेनेची यादी जाहीर

भाजपापाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.

भाजपापाठोपाठ शिवसेनेची यादी जाहीर

मुंबई : भाजपापाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बंधू एकाचवेळी विधानसभेत आपले नशीब आजमावणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही जागा रवी राणा यांच्या पक्षाला हवी होती, मात्र शिंदे सेनेने तिथे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. 

शिवसेनेची पहिली यादी – ४५ उमेदवार

  1. कोपरी पाचपखाडी – एकनाथ शिंदे
  2. साक्री – मंजुलाताई गावित
  3. चोपडा – चंद्रकांत सोनावणे
  4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
  5. एरंडोल – अमोल पाटील
  6. पाचोरा – किशोर पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा – संजय गायकवाड
  9. मेहकर – संजय रायमुलकर
  10. दर्यापूर – अभिजित अडसूळ
  11. रामटेक – आशिष जैस्वाल
  12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
  13. दिग्रस – संजय राठोड
  14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
  15. कळमनुरी – संतोष बांगर
  16. जालना – अर्जुन खोतकर
  17. सिलोड – अब्दुल सत्तार
  18. छत्रपती संभाजीनगर (मध्य) – प्रदीप जैस्वाल
  19. छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) – संजय शिरसाट
  20. पैठण – विलास संदीपान भुमरे
  21. वैजापूर – रमेश बोरनारे
  22. नांदगाव – सुहास कांदे
  23. मालेगाव बाह्य – दादा भुसे
  24. ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक
  25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
  26. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
  27. चांदिवली – दिलीप लांडे
  28. कुर्ला – मंगेश कुडाळकर
  29. माहीम – सदा सरवणकर
  30. भायखळा – यामिनी जाधव
  31. कर्जत – महेंद्र थोरवे
  32. अलिबाग – महेंद्र दळवी
  33. महाड – भरत गोगावले
  34. उमरगा – ज्ञानराज चौगुले
  35. परांडा – तानाजी सावंत
  36. सांगोला – शहाजी बापू पाटील
  37. कोरेगाव – महेश शिंदे
  38. पाटण – शंभूराज देसाई
  39. दापोली – योगेश कदम
  40. रत्नागिरी – उदय सामंत
  41. राजापूर – किरण सामंत
  42. सावंतवाडी – दीपक केसरकर
  43. राधानगरी – प्रकाश आबिटकर
  44. करवीर – चंद्रदीप नरके
  45. खानापूर – सुहास अनिल बाबर

वरळीतून राज्यसभा खासदाराला आमदारकीचे तिकीट 

वरळी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वरळीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे विरुद्ध शिवसेनेचे मिलिंद देवरा अशी लढत होणार आहे.

शिंदे शिवसेनेचे ४५ उमेदवार जाहीर
नऊ मंत्र्यांना पुन्हा संधी
मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
मुंबईतील सहा आमदारांना पुन्हा संधी दिली

संजय गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number