आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत असलेल्या सर्व खासदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत ते खासदारांना कोणत्या सूचना देणार आणि कोणत्या नव्या जबाबदाऱ्या सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव मागील काही बैठकींना गैरहजर राहिले होते.
त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (14 जून) मातोश्री येथे खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.