Homeताज्या बातम्याBhaskar Jadhav : ठाकरेंचे शिलेदार शेतात! भास्कर जाधवांनी गाणी गात केली भाताची लावणी; व्हिडीओ व्हायरल
Bhaskar Jadhav : ठाकरेंचे शिलेदार शेतात! भास्कर जाधवांनी गाणी गात केली भाताची लावणी; व्हिडीओ व्हायरल
आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणीचा आनंद घेतला. सध्या कोकणात पावसाच्या रिमझिम सरी बरसत असून यातच भास्कर जाधव शेती करण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहेत. नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये दिसणारे भास्कर जाधव शेतात मात्र अंगावर चिखल, हातात भाकरी अशा रुपात पाहायला मिळत आहे. […]
आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणीचा आनंद घेतला. सध्या कोकणात पावसाच्या रिमझिम सरी बरसत असून यातच भास्कर जाधव शेती करण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहेत. नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये दिसणारे भास्कर जाधव शेतात मात्र अंगावर चिखल, हातात भाकरी अशा रुपात पाहायला मिळत आहे. गाणी गात कुटुंबियांसह सध्या ते भात लावणीचा आनंद घेत आहेत.